हवामान अपडेट : दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये १९ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा

नवी दिल्ली : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात हवामान स्वच्छ राहणार असून पुन्हा एकदा उकाड्याची तिव्रता वाढणार आहे. दिल्लीसह हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये १७ ते १९ एप्रिल या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट असेल असा इशारा आयएमडीने दिला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये लोकांसमोर याची तीव्रता अधिक असेल. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावारणामुळे तापमानात एक ते दोन डिग्रीची घसरण झाली होती. १९ आणि २० एप्रिल या काळात उष्णतेची लाट असेल. तापमान वाढेल असे आयएमडीने सांगितले होते. त्यानुसार या आठवड्यात दिल्लीचे तापमान पुन्हा ४० डिग्रीवर जाऊ शकते.

नई दुनिया डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, आयएमडीने सांगितले आहे की, आज पुन्हा एकदा हवामान बदलाची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे तापमान २ ते ३ डिग्रीने वाढेल. अशा स्थितीत किमान तापमान २३ ते २५ डिग्री आणि कमाल तापमान ४० ते ४३ डिग्रीपर्यंत राहू शकते. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे दिल्लीत शनिवार, रविवारी तापमान ३८ ते ४० यांदरम्यान राहिले. मात्र, दिल्ली- एनसीआरमध्ये हवेची श्रेणी खराब राहिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने (सीपीसीबी) दिल्लीची हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक २०१ राहिला. इतर ठिकाणी म्हणजे गाझियाबाद, ग्रेटर नोएडा, फरिदाबाद, नोएडा, गुरुग्रामध्येही अशीच स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here