महाराष्ट्रात उष्णतेची लाट थंडावली, तापमानातही घट, या आठवड्यात पडणार पाऊस

मुंबई : महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून पूर्ण आठवडाभर ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहील. यादरम्यान काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रात याचा अधिक परिणाम दिसून येईल. विदर्भात २५ व २६ मार्च रोजी पाऊस पडू शकतो. दुसरीकडे तापमानात घसरण नोंदविण्यात आली आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी पारा ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. तेथे सोमवारी कमाल तापमान ३३ डिग्री सेल्सिअस राहिले.

मात्र, इतर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा कायम राहील. राज्यात हवेची गुणवत्ता बहुतांश शहरांत समाधानकारक राहीली. मुंबईत आज कमाल तापमान ३५ तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस राहील अशी शक्यता आहे. २४ ते २६ मार्च या काळात ढगाळ वातावरण राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. पुण्यात कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस राहील. आजपासून २४ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण असेल. नागपूरमध्ये अद्याप कमाल ४० तर किमान २० तापमान राहील. आज ढगाळ वातावरण राहील. तर उद्या हवामान साफ असेल. त्यानंतर आठवडाभर ढगाळ वातावरण दिसेल. नाशिक आणि औरंगाबाद येथेही अशीच स्थिती राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here