उष्णतेच्या लाटेचा तडाखा, रविवारपर्यंत या राज्यांना बसणार फटका, पावसाचाही इशारा

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये रविवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील असे भारतीय हवामान विज्ञान विभागाने बुधवारी जाहीर केले. यांदरम्यान, दक्षिण भारतातील काही राज्यांत चार दिवस किरकोळ पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मार्च महिन्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांत उन्हाचा तडाखा बसणार आहे. लोकांना मार्च महिन्यातच मे-जून महिन्यातील ऊन्ह जाणवत आहे. हवामान विभागाने सांगितले की, दिल्ली, युपी, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, हरियाणा व मुंबईसह अनेक राज्यांत मे महिन्यासारखे ऊन झाले आहे. उन्हाचा पारा वाढल्याने लोक हवालदिल झाले आहेत. आगामी काही दिवसांत उष्णतेची लाट वाढेल असे हवामान विभागाने सांगितले.

हवामान विभागाने सांगितले की, २५-२७ मार्च या काळात सौराष्ट्र, कच्छमध्ये तर २६ आणि २७ मार्च रोजी गुजरातच्या काही जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जाणवेल. या महिन्यात पाऊस न पडल्यास उष्णता वाढणार आहे. २३ ते २५ मार्च पर्यंत अरुणाचल प्रदेशात पाऊस पडू शकतो. तर केरळ, तामीळनाडू, पुद्दूचेरी, कराईकल, आंध्र प्रदेश, कर्नाटकातही पावसाची शक्यता आहे. तर २६ मार्चपर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here