मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस, शाळा राहणार आज बंद

मुंबई : गणेशचतुर्थीची सुरुवातच रिमझिम पावसाने झाल्यानंतर, बुधवारी पहाटे मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले.

बृहन्मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले, हवामान खात्याने दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज शाळा बंद राहतील. ज्या शाळा सुरु आहेत, अशा शाळेतील मुख्याध्यापकांना, मुलांना सुरक्षितपणे घरी पाठवले जाईल.
हवामान खात्याने 6 सप्टेंबरपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शहरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात मुसळधार पाउस होणार आहे. यामुळे नागरीकांनी खबरदारी घ्यावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत 100 नंबर डायल करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

मुंबईचे किंग सर्कल रेल्वे स्थानक आणि गांधी बाजारालगतच्या भागात पावसामुळे पाण्याचा मोठा तडाखा बसला.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here