छत्तीसगड: अतिवृष्टीमुळे ऊस पीक जमीनदोस्त, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

लुंड्रा/रघुनाथपूर: पाच दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे छत्तीसगड येथील रघुनाथपूर आणि लुंड्रा या परिसरात ऊस पीकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. ऊस शेतकर्‍यांना यावेळी ऊसाच्या मोठ्या उत्पादनाची आशा होती, पण पावसाने या आशेवरच पाणी फेरले आहे. ऊस पिकण्यावेळी जर ऊस शेतात पडला तर त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि ऊस वाकडा होतो, असे मानले जाते. यामुळे ऊसाच्या वजनात घट होते आणि शेतकर्‍यांना ऊस विकायला अवघड जाते.

साखर कारखान्यातही अशा ऊसाला उपयुक्त मानले जात नाही.  ऊस शेतकर्‍यांच्या मतानुसार, यावेळच्या पीकासाठी शेतकर्‍यांनी एक वर्ष वाट पाहिली, की जेणेकरुन कापणीनंतर त्यांना चांगला फायदा होईल. पण मुसळधार पावसाने सर्व काही विस्कळीत केले. ऊसाबरोबर पिकलेले टोमॅटो आणि भाज्यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना अशा परिस्थितीत सरकारकडून नुकसान भरपाई आणि दिलासा मिळेल अशी आशा आहे. क्षेत्रीय विधायक डॉ. प्रीतम राम म्हणाले की, त्यांच्या विधानसभा क्षेत्रात ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.

केरता साखर कारखान्याच्या संचालनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते म्हणाले की, शेतकर्‍यांचे झालेले हे नुकसान भरुन काढण्यात पुढाकार घेवू.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here