मुंबई : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील गडचिरोलीपासून नाशिकपर्यंत अनेर जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. ठिकठिकाणी पाणी घुसल्याचे वृत्त आहे. जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. यादरम्यान, पुण्यात सोमवारी रात्री दुमजली इमारतीची भिंत कोसळून दोघेजण जखमी झाले. यामध्ये दोघांना वाचवण्यात आले. पुण्यासह नाशिकसह ४ जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याला आणखी काही दिवस पावसापासून दिलासा मिळणार नाही अशी शक्यता आहे.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील नाना पेठ भागात रात्री उशीरा दुमजली इमारत कोसळल्याने दोघे जखमी झाले तर दोघांना वाचविण्यात आले. राज्यातील गडचिरोली दिल्ह्यात पावसामुळे तिघे बेपत्ता झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. गोदावरी नदीच्या काठावरील अनेक मंदिरे जलमय झाली आहेत. आयएमडीने १४ जुलैपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाण्याने स्थिती आणखी बिकट झाली आहे. नदीकाठावरील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.