महाराष्ट्रातील या ४ जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा

महाराष्ट्रातील विविध भागात शुक्रवारीही हलका ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारीही रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता गृहीत धरून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १३ ऑगस्ट रोजीही रायगड, रत्नागिरी, सातारा आणि नांदेडमध्येही जोरदार पावसाची यलो अलर्ट देण्यात आला आहे. यापूर्वी गुरुवारीही महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू राहिली. सतत सुरू राहिलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय पावसाशी संबंधीत घटनांमुळे आतापर्यंत ११९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात हवेतील गुणवत्ता निर्देशांक चांगला ते समाधानकारक स्थितीत नोंदला गेला आहे. शुक्रवारी मुंबईतील कमाल तापमान ३१ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. हवामान ढगाळ राहील. तर पावसाचीही शक्यता आहे. पुण्यात किमान २८ तर किमान २३ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. नागपूरमध्ये कमाल तापमान २९ डिग्री सेल्सिअस तर किमान २३ डिग्री सेल्सिअस तापमान असेल. नाशिकमध्ये किमान २२ तर कमाल २८ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here