मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले, वाहतुकीची कोंडी, पाणी साचले

मुंबई : आज सकाळी मुंबईत मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाली असून, अनेक भागात पाणी साचले. भारतीय हवामान खात्यानुसार, मुंबई शहर आणि आसपासच्या भागात वीजेच्या गडगडाटासह जोरदार पाउस पडणार आहे.

खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेट ने सांगितले की, मुंबईतील अनेक भागात येत्या चार ते सहा तासात जोरदार पाऊस पडेल.  मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, अलिबाग, विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, डोंगरी, बोरिवली, गोरेगाव, मुलुंड, पवई, जुहू, दादर, वांद्रे, चेंबूर, कुलाबा, नवी मुंबई, कुर्ला, मीरा अशा काही भागात जोरदार पाउस सुरु राहील. तसेच येत्या 4 ते 6 तासात भाईंदर आणि ठाणे येथेही पाऊस पडेल.

19 सप्टेंबर रोजी नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर भागांसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. दक्षिण मुंबईतही हलका पाउस पडला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here