कोल्हापूरात मूसळधार पाऊस

595

कोल्हापूर, दि. 21 : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांना दिलासा दिला आहे. पाण्याअभावी ऊस, सोयाबीन, भुईमूगासह इतर पिके व्हिंटीलेटरवरच असल्यासारखीच होती. आज दुपारी झालेल्या मूसळधार पावसामुळे या पिकांना जिवदान मिळाले आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात महिन्यापूर्वी पाऊस थांबतोय की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. संततधार आणि मूसळधार पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठेचा सर्व ऊस कुजला आहे. यातच इतर पिकांनाही या पावसाचा फटका बसला होता. दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर गेल्या दहा ते वीस दिवसापासून कडक उन्हामुळे नदी कोरड्या पडल्या आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आज मात्र जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना जिवदान आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले, आजरा, गगनबावडा तालुक्‍यात जोरदार पाऊस झाले आहेत.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here