केरळमध्ये येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता; मृतांचा आकडा 92 वर

केरळ : जोरदार झालेल्या पावसामुळे केरळमध्ये मृत झालेल्यांचा आकडा 92 वर पोचला असून, येत्या 48 तासात मुसळधार पाउस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे पुन्हा नव्याने पूर येण्याची भिती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याच्या अंदजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने केरळमध्ये अलाप्पुझा, इडुक्की, कोट्टायम, एर्नाकुलम, थ्रिसूर, कोझिकोड, वायनाड, मलप्पूरम आणि कन्नूर याठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट जारी केल्यामुळे येथील शैक्षणिक संस्थांना बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी आणि लक्षद्वीप भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 2,24,506 पूरग्रस्तांना 1,243 मदत शिबिरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पावसामुळे 1,057 घरे उद्धवस्त झाली तर 11,142 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध घटनेत 34 जण जखमी झाले असून 61 जण बेपत्ता आहेत.

येथील मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि महसूलमंत्री ई. चंद्रशेखरन यांनी वायनाड आणि मलप्पुरम या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तसेच पूरग्रस्तांची चौकशी करुन मदत शिबिरांच्या कार्याचा आढावा घेतला.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here