राज्यात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : पुढील 48 तासांत पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातील काही भागांत 48 तासांमध्ये वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. हा पाऊस थोड्या वेळासाठी असेल पण मुसळधार असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी वर्तवली आहे.

यानंतर 13 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कमी होईल. पण त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज आहे, असंही कश्यपी यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच कोल्हापूरसह चार जिल्ह्यात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला 9 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये मान्सूननं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रला चांगलंच झोडपून काढलं आहे. राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून मान्सूननं आपल्या परतीचा प्रवास सुरू झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागानं केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here