संयुक्त अरब अमिरातीमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार

दुबई : पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती हा वाळवंटी देश म्हणून ओळखला जातो. मात्र, पावसाचा सर्वांत मोठा फटका दुबईला बसला. शेजारच्या ओमान देशातही मुसळधार पावसामुळे पूर आला. याशिवाय, बहारीन, कतार आणि सौदीतही मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी (ता. १६) मुसळधार पावसाने या देशात हाहाकार माजवला.अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक महामार्गांवर पाणी साठल्याने नागरिकांना वाहने रस्त्यावरच सोडून द्यावी लागली. दुसरीकडे दुबईला येणारी अनेक विमाने दुसरीकडे वळवण्यात आली. या पावसाने आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी सायंकाळपर्यंत दुबईत १२० मिमी पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे रस्ते, वाहने पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. अनेक घरांतही पाणी घुसले. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे अनेक उड्डाणे थांबवण्यात आली. भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिकेला जाणाऱ्या उड्डाणांना याचा मोठा फटका बसला. शाळांना सुट्टी देण्यात आली. सरकारी कर्मचारीही घरीच राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here