महाराष्ट्राच्या उत्तर, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह कोकण विभागात ठिकठिकाणी गुरुवारी पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान केंद्राने जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट दारी केला आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गढचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमालमध्येही पावसाबाबतचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एबीपी लाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३१ तर किमान २५ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल आणि हलका पाऊस कोसळेल. पुण्यात कमाल तापमान ३० तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस राहील. जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये तापमान ३४ आणि २५ असे राहिल. काही काळ पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान २९ तर किमान तापमान २२२ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत आहे. हलक्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद येथे ढगाळ वातावरण राहील. येथे कमाल तापमान ३१ तर किमान तापमान २१ डिग्री सेल्सिअस राहील.