तामिळनाडूत जोरदार पावसाने ३५०० हेक्टरमधील पिके नष्ट

चेन्नई : तामीळनाडूत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सुमारे ५५,००० हेक्टर जमीन जलमय झाली आहे. यामध्ये ३५०० हेक्टरमधील पिके नष्ट झाली आहेत. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांनी सांगितले की, सुमारे ३५०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण किती पिकाचे नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी आणखी कालावधी आवश्यक आहे. पाऊस आणि वादळ थांबल्यानंतर नुकसान भरपाई आणि इतर मदतीबाबतचा निर्णय घेतला जाईल.

जोरदार पावसाने पिक नष्ट झाल्यामुळे केरळसारख्या शेजारच्या राज्यांसाठीचा भाजीपाला पुरवठा बंद पडला आहे. तामिळनाडू किसान संघाच्या सुत्रांनी सांगितले की, केरळला होणारा भाजीपाला पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. साठ टक्के पुरवठा विस्कळीत झाला आहे. यातून एक मिलियन डॉलरचे नुकसान होणार आहे.
चेंगलपट्टूतील भाजीपाला शेतकरी संघाचे सचिव सेल्वा गणपती यांनी सांगितले की, तामीळनाडूतील शेतकरी हळूहळू महामारीतून बाहेर पडत होते. मात्र, अचानक झालेल्या पावसाने सगळ्यावर पाणी पडले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी सरकार पावसाने नुकसान झालेल्या नागरिकांना सर्वोतोपरी मदत करेल अशी घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here