उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाने हाहाकार, जनजीवन विस्कळीत

48

उत्तराखंड राज्यात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. अलमोडा, चमोली, नैनीताल, हरिद्वार, ऋषिकेशसह परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लोकांच्या अडचणीत भर टाकली आहे.

कोसी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. हल्दवानी परिसरात तर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या प्रवाहाने सर्व काही नष्ट झाले आहे. ऋषिकेशमध्ये अशीच स्थिती आहे. ऋषिकेशमधील त्रिवेणी घाट पाण्यात बुडाला आहे. हल्दवानी परिसरात तर भयानक अवस्था झाली आहे. सारे काही जलमय झाले आहे. गोला नदीवरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे दळणवळण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. बद्रीनाथ महामार्ग पाण्यात बुडाला आहे. येथे दरडी कोसळल्याने वाहने अडकली आहेत. जेसीबीची मदत घेऊन त्यांची सुटका केली जात आहे. हवामान विभागाने दोन दिवसांच्या जोरदार पावसाचा इशारा दिला होता. विभागाच्या तज्ञांनी दिलेला इशारा खरा ठरला असून संपूर्ण उत्तराखंडला पावसाशी झुंजावे लागत आहे. आणखी दोन दिवस अशीच स्थिती राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here