मुंबईत जोरदार पावसाची शक्यता, आयएमडीकडून यलो ॲलर्ट

मुंबई : मुंबईत मध्यम तसेच तीव्र पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.
याबाबत, आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई आणि ठाणे या क्षेत्रात विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. नवी मुंबई आणि ठाणे या परिसरात ऑरेंज ॲलर्टवर ठेवण्यात आला आहे. तर मुंबईत यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

मान्सूनच्या सुरुवातीच्या काळापासून मुंबईत सातत्याने पाऊस सुरू झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार घडले आहेत. त्यातच आता पुन्हा जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करत आयएमडीने यलो अॅलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here