उत्तर प्रदेशमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता, यलो अ‍ॅलर्ट जारी

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अ‍ॅलर्ट जारी केला आहे. राज्यातील हमीरपूर, महोबा, सिद्धार्थनगर, कुशीनगरसह काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात ३१ जुलैपर्यंत पावसाची स्थिती कायम राहील. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी आग्रा, फिरोदाबाद, प्रयागराज, प्रतापगड, इटावा, औरेया आणि परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर हमीरपुर, महाराजगंज, सिद्धार्थनगर, कुशीनगर, मथुरा, श्रावस्ती, बलरामपूर, महोबा आणि परिसरात मोठा पाऊस होईल.
शनिवारी, ३१ जुलै रोजी प्रयागराज, चित्रकुट, संत रविदास नगर, वाराणसी, बहराईच, खिरी, बलरामपूर, गोंडा, पिलीभीत परिसरात मोठा पाऊस पडेल. तर सोनभद्र, चंदौली आदी ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here