कर्नाटकमध्ये आणखी २ दिवस जोरदार पावसाचे, राज्यात अलर्ट जारी

बंगळुरू : जवळपास पंधरा दिवसानंतर कर्नाटकमध्ये लोकांना निरभ्र आकाश पाहायला मिळाले. मात्र, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात जोरदार पावसाने निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यादरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्व मंत्री पुराचा फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करतील अशी घोषणा केली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पिकांचे नुकसान झाल्याने तीन लाख शेतकऱ्यांना फटका बसला. त्यांना सरकारने भरपाई दिली आहे. उर्वरीत १३० कोटी रुपये तातडीने दिले जातील असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बेंगळुरू आणि कर्नाटकच्या विविध भागात पाऊस सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आयएमडीने सांगितले की, राज्यात ८७ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. २५ नोव्हेंबरनंतर पावसापासून सुटका होईल असा दावा आयएमडीने केला आहे. जोरदार पावसाच्या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये १३.२ मिमी पावसाच्या तुलनेत २४.७ मिमी पाऊस झाला. राज्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात ५१ टक्के जादा पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here