जुलै अखेरीस दमदार पाऊस, खरीप पिकांना होणार फायदा

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील गेल्या सहा महिन्यात झालेल्या पावसाची कमतरता भरुन निघाली आहे. यासोबतच हा पाऊस खरिप पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात या मान्सूनमध्ये एक ऑगस्टअखेर ३ टक्के जादा पाऊस झाला आहे. हा पाऊस खरीप पिकाच्या उत्पादनाला बळ देईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तुलनेत भात उत्पादकांना याचा लाभ होईल. भात पिकाला पहिल्या ५० दिवसांत जादा पावसाची गरज असते. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांना मदत होईल आणि विहीर, विंधनविहिरींवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

हिंदुस्थान टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमध्ये जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात कमी पाऊस झाला होता. त्यानंतर दक्षिण-पश्चिम मान्सून थांबल्याने पाऊस कमी झाला. मात्र, पुढच्या दोन आठवड्यात चांगल्या पावसामुळे स्थिती बदलली. रविवारपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३८० मिमी पाऊस झाला आहे. नेहमी सरासरी ३६९ मिमी पाऊस होतो. त्यापेक्षा ३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेशातील ७५ पैकी ५० जिल्ह्यात सामान्य अथवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर केवळ २५ जिल्ह्यात थोडा कमी पाऊस झाला आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्ह्यामध्ये पूर्व युपीच्या जिल्ह्यांच्या तुलनेत थोडा कमी पाऊस झाला आहे. पश्चिम युपीमध्ये एक जून पासून एक ऑगस्टअखेर सरासरी ३१० मिमी पाऊस झाला आहे. सामान्य पावसापेक्षा तो ७ टक्के कमी आहे. ७ जुलैपर्यंत या क्षेत्रात सामान्यपेक्षा ३५ टक्के पाऊस कमी झाला होता. पूर्व युपीतील जिल्ह्यांमध्ये १ जून ते १ ऑगस्टदरम्यान ४२७ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस ३९८ मिमी या सामान्य पावसापेक्षा ७ टक्के अधिक आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here