उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांची पिके बुडाली, २३ जिल्ह्यांत अ‍ॅलर्ट

लखनौ : उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांत गुरुवारी संध्याकाळपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश भाग जलमय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने २३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अॅलर्ट जारी केला आहे.

गाझियाबाद आणि परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. लोणी देहात, हिंडन एएफ स्टेशन, गाझियाबाद, इंदिरापूरम, छपरौला, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडामध्ये जोरदार पावसाने लोक हवालदिल झाले आहेत. सहारनपूर, गंगोह, देवबंद, नजीबाबाद, कांधला, सकोटी टांडा, हस्तिनापूर, बडोत, दौराला, बागपत, मेरठ, खेकरा, मोदीनगर, किठोर, पिलाखुवामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरलेले नाहीत. आताच्या पावसाने शेतातील उर्वरीत पिके, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशातील लखनौसह २३ जिल्ह्यांत अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. उन्नाव, रायबरेली, अमेठी, फतेहपूर, कन्नौज, कानपूर नगर, कानपूर देहा, लखनौ, प्रतापगड, वाराणसी, जौनपूर, सुल्तानपूर, अयोध्या, बाराबंकी, सीतापूर, हरदोई, लखीमपूर खिरी, शाहजहांपूर, सिद्धार्थ नगर, बलरामपूर, श्रावस्ती, बहराईच आणि महाराजागंजमध्ये यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here