दक्षिण केरळमध्ये जोरदार पाऊस, पाच जिल्ह्यांल अलर्ट जारी

41

तिरुवनंतपुरम : केरळच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणी साठले आहे. रस्त्यांचे खूप नुकसान झाले असून हवामान विभागाने पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आणखी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अद्ययावत माहितीनुसार, तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनामथित्ता, अलप्पुझा, कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे. इतर पाच जिल्ह्यांमध्ये त्रिशूर, पलक्कड, कोझीकोड, मलप्पुरम आणि वयनाडमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. कोल्लम जिल्ह्यातील पुनालूप -थेनमाला क्षेत्रात रात्रभर पाऊस आणि पाण्यामुळे अनेक घरात पाणी घुसले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here