देशातील या राज्यांत पुढील दोन दिवसांत जोरदार पाऊस, दिल्ली-एनसीआरमध्ये अ‍ॅलर्ट

87

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच गुजरात आणि मध्य प्रदेशात दोन्ही दिवस पाऊस सुरू राहील असे सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिल्ली आणि एनसीआरमध्ये ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. याशिवाय गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान, उत्तर प्रदेशसह देशाच्या मैदानी प्रदेशात १६ सप्टेंबरपर्यंत पाऊस कोसळेल असे सांगितले आहे.

स्कायमेट वेदरने दिलेल्या माहितीनुसार, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, अंदमानसह उत्तर प्रदेशमध्ये पुढील २४ तासात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम बंगाल, झारखंड, गोवा, तेलंगणा, केरळ, उत्तराखंड, आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस होईल.

राजस्थानमध्ये पुढील चार दिवस अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. जयपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोटा, उदयपूर, अजमेर, जोधपूरमध्ये १८ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळेल. हवामान विभागाने ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. पावसाचा कालावधी १५ ते १८ सप्टेंबर असा राहील. तर १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत येथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here