उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्लीत आज जोरदार पाऊस

176

उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, हरियाणा, पंजाब आणि देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बिहारमध्ये नद्यांना पूर आला आहे. तर पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये लोकांना जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात पाऊस आणि पुराशी संबंधीत घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २१३ झाली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकसानग्रस्तांना मदतीसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात होंजार गावात ढगफुटी होऊन बेपत्ता झालेल्या २० जणांच्या शोधासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ढगफुटी झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला. तर १७ जण जखमी झाले. या प्रकारात २१ घरे, एक रेशन दुकान, एक पूल, एक मशीद आणि गाईंसाठी तयार केलेले शेड उद्ध्वस्त झाले. अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली त गुरुवारी मध्यम पावसाची शक्यता आहे. सकाळी तापमानात ३ अंशाची घसरण नोंदविण्यात आली. दिल्लीतील हवेची गुणवत्ता समाधानकारक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सकाळी आठ वाजता हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ५९ नोंदवला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मी, हिमाचल प्रदेश, लडाखमद्ये ढगफुटीच्या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. तर अनेकांची घरे वाहून गेली आहेत. भारतीय हवामान विभागाने दक्षिण बांग्लादेश आणि बंगालच्या खाडीसह किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तासात पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारकडे सरकेल. तर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यांसाठी हवामान विभागाने अॅलर्ट जारी केला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here