चेन्नईसह तामिळनाडूत जोरदार पावसाची शक्यता, स्कूल, कॉलेज बंद

20

चेन्नई, थेनी, तुतीकोरीन आणि डिंडीगुलसह तामिळनाडूच्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आज, १८ नोव्हेंबर रोजी स्कूल आणि कॉलेज बंद करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी रात्री उशीरा हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पूर्वोत्तर मान्सून सक्रिय असल्याने सद्यस्थितीत तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
आयएमडीने चेन्नईतही जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने गुरुवारी राजधानी आणि पसिरातील जिल्हे तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि रानीपेट याच्या किनारपट्टीच्या परिसरात कमी दबावाच्या पट्ट्यामुळे सर्वाधिक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

याशिवाय, तिरुवन्नामलाई, कल्लाकुरीची, सेलम, पेराम्बलुर, तिरुचिरापल्ली, करूर, तंजावूर, तिरुवरुर, पुदुकोट्टई, डिंडीगुल, मदुरै, थेनी, शिवगंगा, विरुधुनगर, तेनकासी येथेही जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरीत जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस कोसळेल असे आयएमडीने सांगितले. कमी दाबाचा पट्टा आजा दक्षिण आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या उत्तर भागाकडे सरकत असल्याचे आयएमडीचे म्हणणे आहे. गेल्या आठवडाभरात पावसामुळे विविध घटनांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here