आणखी तीन दिवस या राज्यांत कोसळणार जोरदार पाऊस

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर पश्चिम भारताच्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर पंजाब, जम्मू-काश्मीर, राजस्थानमध्ये जोरदार वादळासह पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण भारतातील तीन राज्यांमध्ये जोरदार पावसाचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. या राज्यांमध्ये कर्नाटक, केरळ आणि तामीळनाडूचा समावेश आहे.
हवामान विभगाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या रिव्हाइव्हलमुळे या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सात सप्टेंबरसाठीही ॲलर्ट जारी केला असून दक्षिण ओडिसा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, तेलंगणा, विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये कमी दबावाच्या क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मॉन्सूनची ट्रफ रेखा बिकानेर, ग्वाल्हेर, पाटणापासून बंगालच्या खाडीच्या उत्तर-पूर्व भागातून पुढे सरकेल. दुसरीकडे कच्छ आणि परिसरातील भागात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे.

आयएमडीच्या म्हणण्यानुसार ७ ते नऊ सप्टेंबर या दरम्यानउत्तर पश्चिम भारतातील अनेक राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाबचा उत्तर भाग, जम्मू-काश्मीर, राजस्थानमध्ये वादळासह पाऊस कोसळेल.

विभागाने पुढील तीन दिवसांत कर्नाटक, तामीळनाडू आणि केरळमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. यासिवाय पश्चिम बंगालमध्ये सायक्लोनची स्थिती तयार झाल्याने उत्तर आणि मध्य बंगालच्या खाडीत पुढील २४ तासात पाऊस होऊ शकतो.

अशाच पद्धतीने खासगी हवामान एजन्सी स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार आज, ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळपर्यंत आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या काही भागात हलका तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here