अवकाळीने उपासमार होत असलेल्या ऊसतोड मजुरांना मदतीचा हात

अहमदनगर : केदारेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापकाका ढाकणे यांना अवकाळी पावसामुळे ऊसतोडणी मजुरांचे हाल व उपासमार होत असल्याची माहिती मिळताच ढाकणे यांनी ऊसतोडणी मजुरांच्या कोप्यांवर जाऊन त्यांना किराणा साहित्य व उबदार कपडयांचे वाटप केले.
रविवारपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घोटण येथे ऊसतोड मजूर वास्तव्यास असलेल्या ठिकाणी चिखलाची दलदल झाली असून अनेक कामगारांच्या चुली पेटलेल्या नव्हत्या. प्रतापकाका ढाकणे यांनी सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली व या मजुरांना किराणा साहित्य आणि उबदार कपडयांचे वाटप केले. या वेळी बंडू बोरुडे, उद्धव दुसंग, अरुण घाडगे, रणजीत घुगे, कुंडलिक घुगे, जगदीश जगधने, सर्जेराव ढाकणे, दादासाहेब थोरवे, महादेव घुगे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here