महाराष्ट्रात उच्चांकी ऊसाचे गाळप

300

कोल्हापूर : कोविड १९मुळे राज्यभरात आर्थिक व्यवहारावर निर्बंध आले आहे. मात्र, राज्यभरात साखर कारखान्यांनी १००० लाख टनाहून अधिक उसाचे गाळप केले आहे. चालू गळीत हंगामात १००० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करून विक्रम बनविले आहे.

साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात १००६.९० लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर कारखान्यात २९ एप्रिलअखेर १०५५.९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले.
दरम्यान, साखर कारखाना संचालकांना साखरेच्या जादा साठ्याची चिंता भेडसावत आहे. साखर उद्योगाशी संबंधीतांचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा साखरेचे जादा उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात सुमारे ११ लाख हेक्टरवर ऊस शेती करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ही लागण ८ लाख हेक्टरवर करण्यात आली होती असे साखर आयुक्त कार्यालयाने सांगितले.

गेल्या दशकभरात यापूर्वी २०१८-२० मध्ये सर्वाधिक उसाचे गाळप करण्यात आले होते. कारखान्यांनी त्यावेळी ९५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. तर २०१६-१७ या हंगामात सर्वात कमी ३७३ लाख टन उसाचे गाळप झाले होते.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, ८७ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या आधारावर सर्व पैसे शेतकऱ्यंना दिले आहेत. राज्यातील १०१ कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले आहे. चालू गळीत हंगामात ४८ कारखान्यांनी शेतकऱ्यांना ८० ते ९९ टक्के बिले दिली आहेत. राज्यात अद्याप २३ साखर कारखाने सुरू आहेत. तर उर्वरित कारखान्यांनी गाळप हंगाम संपुष्टात आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here