कोरोनाने तोडले आतापर्यंतचे सारे विक्रम, देशामध्ये गेल्या 24 तासात आढळले 62 हजारापेक्षा अधिक रुग्ण

 

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, भारतामध्ये 24 तासांमद्ये कोविड 19 ची 62,538 नवी प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामुळे देशामद्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 20,27,075 पर्यंत पोचली आहे. आतापर्यंत एकूण 13,78,106 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 41,585 रुग्ण मृत्यु पावले आहेत. देशामध्ये कोरोना संक्रमण वाढण्याची गती आता अमेरिका आणि ब्राझीलसारखी होत आहे. भारतात कमीत कमी आर्धी लोकसंख्या कोरोनामुळे यावेळी विविध प्रकारच्या लॉकडाऊन मध्ये आहे. गेल्या काही दिवसांमद्ये विविध राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पूर्ण आंशिक किंवा आठवड्यात लॉकडाउन लागू केंला आहे.

जागतिक महामारीशी झगडणार्‍या लैटिन अमेरिकी देश ब्राझीलमध्ये गुरुवारच्या आकड्यांनुसार 24 तासांदरम्यान कोरोना संक्रमणाचे 51,603 नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच संक्रमितांची संख्या 28 लाखाचा आकडा पार करुन 28,01,921 इतकी झाली आहे.

ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार देशामध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुळे 1154 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या 95 हजाराचा आकडा पार करुन 95,819 वर पोचली आहे. ब्राझीलमध्ये 19,70,767 लोग कोरोनामुक्त झाले आहेत. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटी च्या विज्ञान तसेच इंजनियरींग केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडयांनुसार कोरोना संक्रमित रुग्णांची संख्यांच्या बाबत ब्राझील (28.01 लाख) यापूर्वीच अमेरिके (47,68 लाख) नंतर दुसर्‍या स्थानावर आहे. कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या रुग्णांच्या संख्येतही ब्राझील अमेरिकेनंतर दुसर्‍या स्थानावर आहे.

ब्राजील चे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो सातत्याने कोरोना ला एक सामान्य फ्लू सांगत आले आहेत. ज्यामुळे त्यांना कडक टिकेचा सामना करावा लागला. बोलसोनारो स्वताही कोरोनाग्रस्त होवून ठीक झाले आहेत. ब्राजीलमद्ये कोरोना संक्रमणाचा पहिला रुग्ण 26 फेब्रुवारीला समोर आला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here