होळीची भेट, ६०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४ कोटींची बिले अदा

महराजगंज : गेल्या काही महिन्यांपासून ऊसाचे पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आयपीएल साखर कारखान्याने होळीची भेट दिली आहे. ६०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४ कोटी रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव यांनी सांगितले की, सिसवा येथील आयपीएल साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची जवळपास १० कोटी रुपयांची थकबाकी आहे. होळीपूर्वी शेतकऱ्यांना बिले मिळण्याची प्रतीक्षा होती. बुधवारी कारखान्याने ६०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ४ कोटी रुपये जमा केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अद्याप कारखान्याकडे सहा कोटी रुपये थकबाकी आहे. हे पैसेही गतीने दिले जावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी यादव यांनी आपल्या कार्यालयात कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. थकबाकी गतीने देण्याबाबत त्यांनी सूचना दिली. गडौरा कारखान्यातील संबंधितांनी याची प्रक्रिया पूर्ण करावी. यावेळी सिसवा कारखान्याचे महाव्यवस्थापक कर्मवीर सिंह, गडौराचे महा व्यवस्थापक विश्वामित्र सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here