ऑगस्ट महिन्यात बँकांमध्ये सुट्ट्यांची लयलूट, लाँग विकेंडची संधी

नवी दिल्ली : जर तुमचे बँकेमध्ये काही काम असेल तर ते टाळण्याऐवजी याच महिन्यात तातडीने मार्गी लावावे. कारण, पुढील महिन्यात बँकांना बंपर सुट्ट्या मिळणार आहेत. शहरांमध्ये तसेच इतरत्रही लोकांकडून इंटरनेट बँकिंगचा वापर करीत असले तरी समाजात असाही एक वर्ग आहे की जो नेटबँकिंगपासून खूप दूर आहे. त्याची अडचण होण्याची शक्यता आहे.
खरेतर सध्या बँकांना दर रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या तसेच चौथ्या शनिवारी सुट्टी दिली जाते. याशिवाय प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या सण, समारंभ, उत्सवासह विशेष समारंभानिमित्त त्या-त्या राज्यापुरती बँकांना सुट्टी मिळते.

ऑगस्ट महिन्यात एक ऑगस्ट, ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, २२ ऑगस्ट आणि २९ ऑगस्ट हे दिवस रविवारचे आहेत. यामध्ये स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन सणाचा समावेश आहे. याशिवाय १३ ऑगस्टला पॅट्रीयॉट्स डेमुळे इंम्फाळमध्ये बँकांना सुट्टी राहतील. १४ ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार आहे. तर १६ ऑगस्ट रोजी पारसी नववर्ष असल्याने महाराष्ट्रात बेलापूर, मुंबई आणि नागपूर विभागातील बँका बंद राहतील.

१९ ऑगस्टला मोहरम असल्याने आगरताळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगर या झोनमध्ये बँका बंद राहतील. तर २० ऑगस्ट रोजी मोहरम आणि पहिला ओणम असल्याने बेंगळुरू, चेन्नई, कोची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी असेल. तर २१ ऑगस्टला थिरोवोणममुळे कोची आणि केरळ झोनमध्ये बँका बंद राहतील. २३ ऑगस्ट रोजी श्री नारायण गुरु जयंती असल्याने कोच्ची आणि केरळ झोनला सुट्टी आहे. तर २८ ऑगस्टला चौथा शनिवार आहे. ३० ऑगस्टला जन्माष्टमीची सुट्टी बँकांना असेल. तर ३१ ऑगस्ट रोजी श्री कृष्ण अष्टमीनिमित्त हैदराबादमध्ये बँका बंद राहतील. १९ ते २३ ऑगस्ट या काळात पाच दिवसांचा लाँग विकेंड असेल. त्यामुळे बँका बंद राहील्या तरी पर्यटनासाठी ही संधीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here