एचपीसीएलने जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये आणले इथेनॉल मिश्रीत पेट्रोल

नवी दिल्ली : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जम्मू-काश्मीर आणि लडाख या विभागात इथेनॉल-मिश्रित पेट्रोलचा पुरवठा सुरू केला आहे. असे करणारी ती पहिलीच कंपनी बनली आहे.

याबाबत एचपीसीएलने दिलेल्या माहितीनुसार, लडाख क्षेत्रामध्ये इंधनाचा पुरवठा लेहमधील डेपोतून केला जातो. हा डेपो ११,५०० फूट उंचावर आहे. लडाख क्षेत्रात इतक्या उंचावर, कमी तापमानात इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणणारी एचपीसीएल ही देशातील पहिली तेल कंपनी बनली आहे.

सरकारने तेल कंपन्यांना कार्बन उत्सर्जनात कपातीसाठी आणि तेलाची आयात कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे आदेश दिले आहेत. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट आहे. एचपीसीएलचा लेह येथील डेपो २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. येथे ४,४५० किलोलीटर टँकची क्षमता आहे. देशातील उत्तर विभागातील हा सर्वात महत्त्वपूर्ण तेल डेपो आहे. सीमेवर तैनात भारतीय सैन्य दलाची मागणी येथून पूर्ण केली जाते.

एचपीसीएल ही देशातील पहिली अशी तेल कंपनी आहे, ज्या कंपनीने जम्मू-काश्मीर क्षेत्रात आपल्या किरकोळ वितरण केंद्रांतून इथेनॉल मिश्रीत पेट्रोलची विक्री सुरू केली. इथेनॉल ही २१ व्या शतकातील भारताची गरज आहे. इथेनॉल चांगल्या पर्यावरणासाठी फायदेशीर ठरेल. त्याचा शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. एचपीसीएलचे हे पाऊल देशाला २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दीष्टाला प्रोत्साहन देईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here