35,000 बँक कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी

हांगकांग शंघाई बैंकिंग कॉरपोरेशन (HSBC) ने मंगळवारी आपल्या कारभारात फेरबदलाची घोषणा केली, ज्या अंतर्गत 35,000 लोकांची नोकरी जाऊ शकते. कंपनीला सलग तीन वर्ष होणार तोटा हे याचे प्रमुख कारण आहे.

बैंक मूल्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्ध, यूरोपीय संघाकडून ब्रिटेन चे प्रस्थान आणि आता चीन मध्ये घातक नव्या कोरोन वायरस मुळे बँके ला अनिश्चिततांचा सामना करत आहे.

यावेळी एशिया मधील व्यापाराने अलीकडील वर्षात चांगली कामगिरी केली आहे, पण युरोप आणि अमेरीका यांना मात्र निराश केले आहे. बैंकेचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्युइन म्हणाले, या कारभारातील काही भाग योग्य पध्दतीने काम करत नाहीत. त्यामुळे आमच्या गुंतवणकदारांना चांगला परतावा देण्यासाठी आम्ही आमच्या योजनेचा पुनर्विचार करत आहोत.

ते म्हणाले, येणाऱ्या तीन वर्षात जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची संख्या 235,000 ते 200,000 इतकी कमी होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here