एचएसबीसी मधील 10 हजार कर्मचार्‍यांना निरोपाचा नारळ

लंडन : ब्रिटनच्या एचएसबीसी बँकेकडून लवकरच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. यामुळे 10 हजार कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे. बँकेचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्विन यांनी सांगितले. महिनाखेरीस चालू तिमाहीचे निकाल समोर आल्यानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल.

पहिल्या टप्प्यात 4700 कर्मचार्‍यांची कपात केली जाईल. अधिक वेतन असणार्‍यांना कर्मचार्‍यांना सर्वप्रथम कामावरून कमी केले जाईल.  नोएल क्विन यांनी ऑगस्ट महिन्यात एचएसबीसीच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतली होती. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता हा निर्णय घेणे गरजेचे होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी बदलांची आवश्यकता आहे. चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापार युद्ध वाढल्यामुळे उद्योग क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे ही कपात होत असल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला.

यापूर्वी एचएसबीसीकडून भारतातील कार्यालयांमधून 150 कर्मचार्‍यांना हटवण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने पुणे आणि हैदराबाद मधील कार्यालयांचा समावेश होता. जागतिक स्तरावर एचएसबीसी बँकेकडून व्यवस्थेची पुर्नबांधाणी करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here