बिहारमध्ये इथेनॉल उद्योगासाठी प्रचंड प्रयत्न : शाहनवाज हुसेन

केंद्र आणि राज्य सरकार बिहारमध्ये उद्योगांच्या विकासासाठी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत असे बिहारचे उद्योग मंत्री शहनवाज हुसेन यांनी सांगितले.

बिहारमध्ये लवकरात लवकर इथेनॉल उद्योग सुरू केला जाईल. त्याच्या स्थापनेसाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न सुरू आहेत असे ते म्हणाले ‌ काउन्सिल ऑफ लेदर एक्स्पोर्टच्यावतीने दिल्ली येथे आयोजित गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते.
दिल्लीतील या कार्यक्रमानंतर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना बिहारचे मंत्री हुसेन यांनी सांगितले की, बिहारमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे नेतृत्व एनडीए करीत आहे ‌ आम्ही सर्वांना बिहारमध्ये उद्योग सुरू करावेत असे आवाहन केले आहे. एकदा बिहारमध्ये या आणि गुंतवणूक करा असे सांगितले आहे.

ते म्हणाले, बिहारमध्ये कमी खर्चात मनुष्यबळ उपलब्ध आहे. पाण्याच्या सोयी सुविधा आहेत. चांगल्या जागाही आहेत. आम्ही उद्योजकांना येथे येऊन उद्योग सुरू करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. आम्ही बिहारमध्ये उद्योग आणि रोजगार क्षेत्रात खूप काम करत आहोत ‌ इथेनॉल निर्मिती उद्योगासाठी परीश्रम घेतले जात आहेत. अनेक जिल्ह्यांसाठी प्रस्तावही दाखल झाले आहेत. लवकरच हे उद्योग बिहारमध्ये सुरू होतील असे मंत्री हुसेन यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here