पोक्का बोईंग रोगाचा शेकडो एकरातील ऊस पिकाला फटका

त्रिची : पोक्का बोईंग रोगामुळे तंजावर जवळील पापनासम मध्ये शेकडो शेतकऱ्यांची ऊस शेती नुकसानग्रस्त झाली आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, आपल्या पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकऱ्यांनी पाच महिने जुने ऊस पिक नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. पापनासम विभागात विरमणगुडी, गणपती अग्रहारम, सोमेश्वरपूरम आणि मनालूर तसेच तिरुवैयारु येथील इचंगुडी, पेरामुर, ओक्का कुडी अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी १००० एकरहून अधिक क्षेत्रात ऊस पिक घेतले आहे. यातील जवळपास ३०० एकर ऊस पिकावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव झाला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, आसपासच्या शेतांमध्ये हा रोग गतीने पसरत आहे.

दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पापनासम मधील शेतकऱ्यांनी सांगितले की, या रोगाचा फैलाव झाल्याने हळूहळू पिकाची वाढ खुंटली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, ऊस लावण्यासाठी प्रती एकर एक लाख रुपये खर्च येतो. आतापर्यंत आम्ही ३०,००० रुपये खर्च केले आहेत. आणि पूर्ण पैसे वाया गेले आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या शेताची पाहणी करून पंचनामा करावा तसेच या रोगापासून पिक वाचविण्याचे उपाय सुचवावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ऊस पिकासाठी कोणत्याही प्रकारचा विमा नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पिकांची पाहणी करणार आहोत. फक्त रासायनिक औषधांच्या फवारणीने हा रोग नष्ट करता येणार नाही. आम्हाला नैसर्गिक प्रयोग करावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here