मी शेतकर्‍यांसोबतच, त्यांचा हक्कासाठी लढत राहणार: राजू शेट्टी

284

कोल्हापूर/पुणे : लोकसभा निवडणूकीत मोठा पराभव झाल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असून, युती सरकारला घेरण्यासाठी तयार आहेत. जरी ते निवडणूक लढवत नसले तरी, आपले उमेदवार जिंकून यावेत यासाठी ते रणनीती आखत आहेत. शेट्टी म्हणाले, तरुण आणि नवे चेहरे भविष्य आहेत आणि साखरपट्टा मानल्या जाणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रात पूराचा साखर उद्योगावर पुढील वर्षीही मोठा परिणाम होवू शकतो.

महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाचे गॉडफादर अशी ओळख असणार्‍या शरद पवार यांच्या विरोधात राजू शेट्टी यांनी मोर्चा काढला होता, ज्यामुळे शेट्टी यांना ऊस शेतकर्‍यांचे मोठे समर्थन मिळाले. साखर कारखान्यांच्या मालकांविरोधात शेट्टींच्या या आक्रमकतेमुळे शेट्टी शेतकर्‍यांसाठी मसिहा ठरले. ज्यामुळे त्यांना राजकारणातही मोठे यश मिळाले आणि बघता बघता शेट्टी जिल्हा पंचायत सदस्यावरुन आमदार आणि लगेच संसदेतही निवडले गेले.  शेट्टी यांच्यावर असे आरोप लावले जातात की, जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यावेळी शेट्ठी आघाडी सरकारने साखर कारखानदारांवर सक्ती दाखवावी यासाठी आक्रमक झाले होते. पण आता त्यांच्याबाबतचा विरोध खूपच शिथिल झाला आहे. याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, असे बोलून भाजपने मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे.

कोल्हापूरात 23 साखर कारखाने आहेत. यापैकी दोन कारखाने सोडल्यास, इतर सर्व कारखान्याचे मालक एकतर भाजपवासी तरी झालेत किंवा भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांचे संबंध चांगले आहेत. मी कायम ऊस शेतकर्‍यांसोबत आहे आणि त्यांच्या मागण्यांसाठी साखर कारखान्यांविरोधात आवज उठवत राहणार. पण साखर उद्योजक भाजपात गेले आहेत. आता काँग्रेसवर आक्रमक होण्यात काहीच अर्थ नाही.  स्वाभीमानी शेतकरी संघटनेची विधानसभा निवडणूकीचे अभियान केवळ पूर आणि सरकारच्या अपयशाच्या मुद्द्यांभोवतीच फिरत आहे. स्वाभीमानीने आरोप केला की, प्रशासन शेतकर्‍यांना या आपत्तीबाबत माहिती देण्यामध्ये अयशस्वी राहिले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here