उसासाठीच्या पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन करण्यावर आयसीएआरचा भर

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) उपमहासंचालक (नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन) डॉ. एस. के चौधरी यांनी बुधवारी पाणी, खते आणि कीटकनाशकांच्या योग्य वापरावर भर दिला. आयसीएआरमध्ये इन-सिटू आणि रिमोट सेन्सिंग, इको-हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग अॅट फील्ड आणि बेसिन स्केल या चार कार्य पॅकेज अंतर्गत संशोधन प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हिंडन रूट्स सेन्सिंगवर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. चौधरी यांनी केले.

पाणी-केंद्रित पीक असलेल्या ऊसातील पाणी, खते आणि कीटकनाशकांचे शास्त्रीय व्यवस्थापन केल्यास पिकाची उत्पादकता वाढेल. शेतीमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासही हातभार लागेल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
धोरणात्मक सुधारणांसाठी याचे सखोल प्रमाणीकरण वाढवण्याची सूचना केली. विकसित केलेल्या चांगल्या जलव्यवस्थापन पद्धती राबविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आयसीएआर-सीएसएसआरआयचे प्रकल्प अन्वेषक डॉ. डी. एस. बुंदेला यांनी प्रकल्पाच्या भविष्यातील दृष्टिकोनावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, यातून जलप्रदूषण कमी करण्यास हातभार लागू शकते. प्रो. जोस व्हॅन डॅम यांनी प्रकल्पातील आंतरराष्ट्रीय भागीदाराचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषत: ऊस लागवडीमध्ये प्रभावी पाणी व्यवस्थापनासाठी ईरी-वॉट डेटा-बेसचा वापर याबद्दल त्यांनी माहिती दिली. आयसीएआर-सीएसएसआरआयचे संचालक डॉ. आर. के. यादव यांनी नियोजित उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here