इथेनॉलसाठी मक्याचे उत्पादन वाढवण्यावर ICAR-IIMR चा भर

नवी दिल्ली : भारतीय अन्न महामंडळाने (FCI) इथेनॉल उत्पादनासाठी तांदळाचा पुरवठा स्थगित केल्यामुळे मका लागवडीला गती देण्याची आवश्यकता असल्याचे मत लुधियाना येथील ICAR-Indian Institute of Maize Research (IIMR) च्या तज्ज्ञांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमांतर्गत भारत सरकारचे २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट आहे. FCI ने पुरविलेल्या तांदळाने इथेनॉल उत्पादनात योगदान दिले आहे. परंतु त्याचा पुरवठा नुकताच थांबवला गेला. त्यामुळे धान्यावर आधारित डिस्टिलरीजमधील इथेनॉल उत्पादनावर परिणाम झाला आहे.

तांदूळ पुरवठा बंद झाल्याने अधिकाऱ्यांनी आपले लक्ष मक्याकडे वळवले आहे. सध्या मक्का प्रामुख्याने पशुखाद्यासाठी वापरला जातो. मक्यापासून बायोइथेनॉल उत्पादनास गती मिळाल्यास पंजाबसह वायव्य भारतातील पीक विविधतेस नवी संधी मिळेल. याबाबत हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, IIMR चे संचालक, एच. एस. जाट यांनी ई २० चे उद्दिष्ट गाठण्यासाठी अतिरिक्त मक्क्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, मक्क्याला अधिक दर बाजारात मिळू शकतो आणि त्यातून शेतकऱ्यांना फायद होईल.

IIMR चे बायोकेमिस्ट धरम पॉल यांनी प्रगत स्टार्च सामग्रीसह मक्का हायब्रीड विकसित (maize hybrids with elevated starch content) करण्याबाबत सुरू असलेल्या संशोधनाची माहिती दिली. बायोइथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी याची गरज असल्याचे म्हटले आहे. तर IIMR चे ब्रीडर डॉ. एस. बी. सिंह यांनी आयएमएच-२२२ आणि आयएमएच-२२३ यांसारख्या प्रगत उत्पादनाच्या मक्का शेतीवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here