कोविडनंतरच्या काळात आईस्क्रीम विक्रीची भरारी

नवी दिल्ली : कोविड १९ महामारीमुळे भारतातील आईस्क्रीम उद्योग गेले वर्षभर पूर्णपणे बंद पडला होता. आता कोविडनंतरच्या नव्या काळात आईस्क्रीम विक्रीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

देशातील आईस्क्रीम व्यवसाय सुमारे १९००० कोटी रुपयांचा आहे. यामध्ये अमूल, हिंदुस्थान युनीलिव्हर (एचयूएल), वाडीलाल आणि मदर डेअरी यांच्यासारख्या कंपन्यांनी २०१९च्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात विक्रीत घेतलेली झेप दिसून येत आहे.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे (अमूल) कार्यकारी संचालक आर. एस. सोढी यांनी सांगितले, की आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. एक मार्चपासून सुरू झालेल्या आईस्क्रीमचा हंगामात पहिल्या चार महिन्यात शंभर टक्के व्यवसाय वाढीची अपेक्षा आहे.

मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबलचे बिझनेस हेड संजय शर्मा म्हणाले, मार्च महिना हा आईस्क्रीम उद्योगासाठी खूपच वेगळा असेल. कारण आम्ही या महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात आईस्क्रीमची एवढी विक्री केली आहे, जी गेल्या महिनाभरातही झाली नव्हती. तर लॉकडाउनच्या काळात जेवढा फटका बसला होता, त्या तुलनेत आम्हाला मागणीत मोठी वाढ दिसत असल्याचे एचयूएलच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here