बँक करणार कोचरांकडून 12 कोटींची वसुली

व्हीडिओकॉन समूहाच्या कर्ज प्रकरणी दोषी आढललेल्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या विरोधात आयसीआयसीआय बँकेने कठोर भूमिका घेतली आहे. एप्रिल 2006 ते मार्च 2018 या कालावधीत कोचर यांनी घेतलेली वेतनवाढ, शेअर्स, बोनससह 12 कोटी परत मिळवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नुकताच ’ईडी’ने कोचर यांचा मुंबईतील फ्लॅट आणि पती दीपक कोचर यांची काही संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीचे मूल्य 78 कोटी रुपये असल्याचे वृत्त आहे. चंदा कोचर यांच्या विरोधात ही कारवाई 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन समूहाला देण्यात आलेल्या 3250 कोटी रुपये कर्जाच्या संदर्भात करण्यात आली होती. आयसीआयसीआय बँकेने कोचर यांना बडतर्फ केले होते. परिणामी एप्रिल 2006 ते मार्च 2018 या कालावधीत कोचर यांनी घेतलेली वेतनवाढ, शेअर्स, बोनससह इतर लाभ असे 12 कोटी बँकेला परत घेण्याचा अधिकार आहे. कोचर यांच्या भूमिकेमुळे बँकेची प्रतिमा मलीन झाली. शेअर बाजारात समभागधारकांचे मोठे नुकसान झाले असे बँकेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. व्हीडिओकॉन कर्ज प्रकरणी चौकशीसाठी बँकेने कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. कोचर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये राजीनामा दिला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here