इक्रा ने साखर उत्पादनाचा अंदाज कमी करून एवढे टन केले 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

नवी दिल्ली : चीनी मंडी

साखरेच्या बाजारात मागणी पेक्षा पुरवठाच जास्त राहील, असे भाकीत रेटिंग एजन्सी आयसीआरए यांनी व्यक्त केले आहे. भारतातील सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशातील उत्पादनात घट होत असल्यामुळे एकूण साखर उत्पादन ३१५ लाख टनांवरून ३०७ लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आयसीआरए या संस्थेने व्यक्त केली आहे.

भारतात सध्या बी ग्रेड मळी आणि थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यावर भर देण्यात येत असल्यामुळे पुढे साखरेच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. मुळात भारतातील साखर हंगाम सुरू होतानाच ऑक्टोबर २०१८ मध्ये हंगामातील साखर उत्पादन ३१५ लाख टन होईल, असा पहिला अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, आता आयसीआरए संस्थेने ३०७ लाख टनापर्यंत उत्पादन खाली येईल, असे म्हटले आहे. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे त्रस्त असलेल्या भारतातील साखर उद्योगाला केंद्र आणि राज्य सरकारांकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे.

दरम्यान, एजन्सीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार साखरेच्या मागणीपेक्षा उत्पादन जास्त होणार आहे. इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात आलेला ऊस आणि इतर कारणांनी कमी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी, साखरेचे अतिरिक्त उत्पादन सुरूच राहणार आहे. त्यामुळे पुरवठ्यावर दबाव येत आहे. परंतु, केंद्र सरकारकडून साखरेच्या किमान विक्री किमतीत करण्यात आलेली वाढ, राज्य सरकारांकडून इथेनॉल उत्पादकांना थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यासाठी देण्यात येत असलेली कर्ज योजना यांमुळे साखर कारखान्यांना बराच दिलासा मिळाला आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here