सपाचे सरकार सत्तेवर आल्यास ऊस दर वाढवू: प्रदेश अध्यक्ष नरेश पटेल

137

कुशीनगर : केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचया उत्पादन खर्चानुसार ऊस दर मिळत नसल्याची स्थिती आहे. या सरकारने डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅससह इतर साहित्यांच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. सरकार महागाई आणि बेरोजगारी सांभाळण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे जर २०२२ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आले तर ऊस समर्थन मूल्य ४०० रुपये प्रती क्विंटल करू अशी घोषणा सपाचे प्रदेश अध्यक्ष नरेश पटेल यांनी केली. विभागात आयोजित शहीद किसान दिवस पुण्यतिथी कार्यक्रमात पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालेल्या शेतकरी जमादार मियाँ आणि पडोही येथील स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

केंद्रात भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष गेल्या साठ-पासष्ट वर्षांपासून सत्तेवर आहेत. हे दोन्ही पक्ष बड्या घराण्यांचे आहेत. त्यांना गरीबांचे काहीच वाटत नाही. सरकार स्थापन करताना मोदी यांनी शंभर दिवसात महागाई संपुष्टात आणू अशी घोषणा केली होती. मात्र, आता महागाई गगनाला भीडली आहे. शेतकऱ्यांना शंभर रुपये लिटर दराने डिझेल खरेदी करावे लागत आहे. घरगुती गॅसचा दर भडकलेला आहे. सपा सरकारमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन तथा लोहिया योजनेअंतर्गत साडेतीन लाख रुपये दिले जात होते. महागाईवर नियंत्रण आणि बेरोजगारांना रोजगार संधी मिळवून देण्यासाठी राज्यात सपाचे सरकार सत्तेवर आणण्याची गरज आहे.

लखीमपूर खिरीचे आमदार शशांक यादव यांनी भाजर सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत अशी टीका केली. महागाईमुळे डिझेल, कामगार, खाद्य, खते, बियाणे खरेदी करताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतकरी आंदोलने करीत आहेत असे ते म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री राधेश्याम सिंह, आमदार रामअवध यादव, सनी यादव, माजी राज्यमंत्री ब्रह्माशंकर त्रिपाठी, माजी आमदार पूर्णमासी देहाती, नंदकिशोर मिश्रा, शंभू चौधरी, कासिम अली, हरीश राणा, डॉ. मनोज यादव, मोहम्मद इलियास अन्सारी, दिग्विजय सिंह, रणविजय सिंह, राजेश्वर गोविंद राव आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here