बँक समस्या सोडवत नसेल तर थेट RBI कडे नोंदवा आपली तक्रार

नवी दिल्ली : जर तुमची बँक अथवा एनबीएफसी तुमच्याकडून मनमानी शुल्क वसुली करत असेल आणि वारंवार तक्रार करूनही त्यावर तोडगा काढला जात नसेल तर तुम्ही थेट आरबीआयकडे बँक अथवा एनबीएफसीची तक्रार नोंदवू शकता. आरबीआयने ग्राहकांशी बँकिंगशी संलग्न समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. आरबीआय सीएमएसवर तुम्ही बँकेकडून मनमानी शुल्क आकारणी, अधिक दंड वसुली, कर्ज पूर्ण झाल्यानंतर एनओसी देण्यास उशीर अशा बँकिंगशी संबंधीत तक्रारी नोंदवू शकता.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आरबीआयकडे तक्रार देण्यासाठी तुम्हाला आधी cms.rbi.org.in वर लॉगिन करावा लागेल. तेथे फाइल ए कंप्लेंट यावर क्लिक करा. स्क्रीनवरील कॅप्चा नोंदवा. तेथे ओपन होणाऱ्या नव्या पेजवर आपले नाव, मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपी मिळवा. त्यानंतर बँकेचे नाव व तक्रारीची पूर्ण माहिती द्या. येथे तुम्ही बँकेकडून नुकसान भरपाईही मागू शकता. शेवटी रिव्ह्यू आणि सबमिटवर क्लिक करा. ऑफलाइन तक्रार नोंदविण्यासाठी आरबीआयला पत्र लिहावे. ते ‘सेंट्रलाइज्ड रिसिप्ट अँड प्रोसेसिंग सेंटर’ (Centralised Receipt and Processing Centre) चौथा मजला, सेक्टर १७, चंडीगड, पिनकोड – १६००१७ वर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here