ऊसाचे पैसे त्वरीत न मिळाल्यास शेतकरी महामेळावा भरवणार

रुडकी : इकबालपूर साखर कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. जर लवकर ऊस बिले मिळाली नाहीत, तर शेतकरी महामेळाव्याचे आयोजन करतील असा इशारा राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पदमसिंह भाटी यांनी दिला.

इकबालपूर येथे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत अध्यक्ष भाटी म्हणाले, गेले तीन महिने साखर कारखाना सुरू आहे. या हंगामात अवघ्या २५ दिवसांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. एक महिन्याचा अॅडव्हान्स देण्यात आला आहे. त्याचे पैसे कारखाना व्यवस्थापनाकडून दहा दिवसात मिळतील. मात्र कारखान्याने जी साखरेची विक्री केली आहे, त्याच्या ८० टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले पाहिजेत असा नियम आहे. तरीही कारखाना व्यवस्थापन त्याचे पालन करीत नाही. काही साखर चोरट्या पद्धतीने विकली जात आहे. त्याचा पूर्ण तपशील आमच्याकडे आहे.

यंदाच्या हंगामात साखर कारखाना मार्च अथवा एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहिल. मात्र, शेतकऱ्यांचे किमान शंभर कोटी रुपये कारखानदारांकडून थकवले जातील. २०१७-१८ या वर्षातील शेतकऱ्यांचे १५० कोटी रुपये अद्याप थकीत आहेत. न्यायालयाने याबाबत आदेश दिला आहे. मात्र, पैसे देण्यात आलेले नाहीत. जर कारखान्याकडून लवकर पैसे देण्याची व्यवस्था केली गेली नाही, तर इकबालपूर साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा महामेळावा आयोजित केला जाईल. कारखान्याने आपल्या कर्मचाऱ्यांनाही पाच महिन्याचा पगार दिलेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. डॉ. अनिल, पहल सिंह, अजय, इकराम, दुष्यंत त्यागी, रफल सिंह, बबलू, रामपाल, सतीश, जुल्फकार आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here