साखरेचा दर ३८०० केल्यास उसाला जादा दर देणे शक्य : आ. अरुणअण्णा लाड

सांगली : सरकारी स्तरावर साखरेचा दर ३१०० रुपयांवरून वाढवून ३८०० रुपये करण्याची गरज आहे. तरच उसाला अजूनही दर देणे शक्य आहे. उत्पादन खर्च आणि विक्रीची सांगड घातली तर हे शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले. कुंडल (ता. पलूस) येथे क्रांती अग्रणी डॉ. जी. डी बापू लाड साखर कारखान्याच्या २२ व्या गाळप हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड प्रमुख उपस्थित होते.

ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते काटा पूजन आणि गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगामाचा प्रारंभ केला. क्रांती साखरचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले की, साखर कारखान्यांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खरेतर बँकांची, तोडणी वाहतूक, कर्मचारी पगार, शेतकरी ऊस बिल ही सर्व देणी देण्यासाठी किमान १६०-१८० दिवस कारखान्यांचा हंगाम होणे गरजेचे असते, पण यंदा हंगाम १०० ते १२० दिवसांच्या आसपासच होईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे साखर कारखान्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या स्थितीतून मार्ग काढण्याची गरज आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, मोहन पाटील, कुंडलिक एडके, सुरेश शिंगटे, श्रीकांत लाड, सुनील पवार, आर. व्ही. पवार, दिलीप लाड, संचालक दिलीप थोरबोले, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, सुकुमार पाटील, अशोक विभुते, अंजना सूर्यवंशी, अश्विनी पाटील शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here