ऊसतोड मजूर परतले नाहीत तर गाळप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता

ऊस गाळप हंगामा दरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये ऊसतोडीसाठी लाखो तोडणी मजुरांची गरज असते. कोरोना महामारी च्या वाढत्या प्रकोपामुळे तोडणी मजुरांमध्येही भितीचे वातावरण आहे. ज्याचा थेट परिणाम साखर हंगामावरही दिसून येवू शकतो. ज्यामुळे गाळप मंदगतीने होण्याची शक्यता आहे. देशामध्ये गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरु होतो. देशातील मुख्यतः साखर कारखाने अजूनही ऊसतोडी साठी प्रवासी मजुरांवर विश्‍वास ठेवतात. आणि जर प्रवासी मजुर चांगल्या संख्येमध्ये येत नसतील तर गाळपावर परिणाम पडू शकतो.

महाराष्ट्रामध्ये तोडणी मजुरांची संख्या जवळपास 7 ते 9 लाख आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये साखर कारखाने ऊस तोडीसाठी प्रवासी मजुरांवर अवलंबून आहेत. कोरोना च्या वाढत्या प्रकोपामुळे प्रवासी मजुरांचे येणे सस्पेन्स बनला आहे.

अनेक क्षेत्रांमध्ये ऊस तोडीसाठी जास्तीत जास्त हार्वेस्टर मशीन्सचा वापर करण्यासाठी सांगितले आहे, जेणेकरुन इतर क्षेत्रातून येणार्‍या ऊस तोड मजुरांवर निर्भरता कमी केली जावू शकते. आता साखर कारखान्यांना ही भिती आहे की, कोरोना संक्रमणाच्या वाढत्या आकड्यांमुळेतोडणी मजूर या व्यवसायाकडे दुर्लक्ष करतील. गाळपामध्ये उशिर झाल्यामुळे भारतीय साखर कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन मंदगतीने होवू शकते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here