‘केवळ साखर उत्पादन केला तर, ईश्वर तुमचे रक्षण करो’

पुणे : चीनीमंडी

महाराष्ट्राच्या विकासाचा कणा असणारा हा साखर उद्योग आहे. साखर कारखान्यांचे तर आहेच पण, शेतकऱ्यांचे भविष्यही त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. साखर उद्योग आता एक बदलाच्या वळणावर आला आहे. जे कारखानदार केवळ ऊस पिकवतील आणि साखरेचं उत्पादन वाढवतील, ईश्वर त्यांचं रक्षण करो, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. सध्याच्या घडीला जे बदलतील तेच या व्यवसायात टिकतील, असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पुण्यात झालेल्या साखर परिषद २०-२० च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख प्रमुख उपस्थित होते.

नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात साखर उद्योग केवळ साखर उत्पादनामुळे कसा अडचणीत आला आहे, यावर प्रकाशझोत टाकला. साखर कारखान्यांनी उपपदार्थांच्या निर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. गडकरी म्हणाले, जगात ब्राझीलची साखर २२ रुपये किलो आहे. त्यामुळं आपली साखर कोणी घेत नाही. सध्या सबसिडीवर साखर निर्यात केली जात आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे आता साखरे ऐवजी इथेनॉलचा पर्याय स्वीकारणं गरजेचं आहे. देशाचे सात ते आठ लाख कोटी रुपये कच्च्या तेलावर खर्च होता. त्यामुळं इथेनॉलचा पर्याय योग्यच आहे. देशाची इथेनॉलची इकॉनॉमी दोन लाख कोटी रुपयांपर्यंत नेऊ शकतो. त्यामुळे इथेनॉलला आता तरी कोणता धोका नाही. त्यामुळे साखर करायची की इथेनॉल हे ठरवावं लागेल. साखरेला आता यापेक्षा जास्त सरकार मदत करू शकत नाही. इथेनॉलमध्ये शेतकऱ्यांचाही फायदा आहे.

इथेनॉलच्या पुढे बायो प्लास्टिकचा पर्याय

इथेनॉलला खरचं मार्केट आहे की नाही? याविषयी शंका उपस्थित केली जात आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, इथेनॉलचं उत्पादन जर जास्त झालं तर, बायो प्लास्टिकचा पर्याय पुढे आला आहे. इथेनॉलपासून बायोप्लास्टिक तयार होऊ लागलं आहे. सध्या ब्राझीलमध्ये इथेनॉल केवळ २८ रुपये लिटर असल्यानं त्यांचं बायो प्लास्टिक स्वस्त आहे. लॅबोरेटरीनं हे प्लास्टिक विघटन होऊ शकतं, असं प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळं तुम्ही इथेनॉलचा विचार करत असाल तर पुढची दहा वर्षे तरी त्याला मरण नाही, असं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

साखर कारखाना नको रे बाबा

केंद्रात मंत्री असलो तरी, मी देखील साखर कारखान्याशी संबंधित आहे. मी अपघाताने या क्षेत्रात आलो. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या आणि भावनेच्या भरात मी साखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुदैवानं या क्षेत्रात धडपडण्यात माझी बरीच वर्षे गेली आता सगळं सुरळीत सुरू असलं तरी, एखाद्याला कोणताही व्यवसाय कर खरं साखर कारखाना सुरू करू नकोस, असा सल्ला देईन, अशी स्पष्टोक्ती नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांच्या या वक्तव्यावर सभागृहात हशा पिकला.

काय म्हणाले गडकरी?

देशात पाण्याची कमतरता नाही तर, पाण्याच्या नियोजनाची कमतरता

पाण्याचा अनावश्यक वापर करणं हे गुन्हाच आहे

उसाची शेती आता ठिंबक सिंचनाकडे गेली पाहिजे

साखर कारखान्यांचे व्यवस्थापन चिंतेचा विषय; वाहतुकीचा खर्च अधिक

विदर्भातील चार जिल्हे आता डिझेलमुक्त करण्याचा प्रयत्न

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here