आयएमडीने देशभर जारी केला जोरदार पावसाचा अलर्ट, अनेक राज्यांत होऊ शकतो मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरातील अनेक राज्यांसाठी जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने सांगितले की, काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशा अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाचा अलर्ट असल्याने प्रशासने जोरदार तयारी केली आहे. SDRF आणि NDRF च्या पथकांनी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचे निर्देश दिले आहेत.

याबाबत टाइम्स नाऊ हिंदीच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात २३ जुलैपासून चार दिवस जोरदार पावसाचे अनुमान आहे. मुंबई, कोकण, नाशिक, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अलर्ट आहे. गुजरातमध्ये २३ ते २५ जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) कच्छ, मेहसाणा, साबरकांठा, अरावलीमध्ये रेड अलर्ट आहे. उत्तर प्रदेशात २३ जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आहे. आठ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट आहे. हवामानशास्त्र विभागाने उत्तर प्रदेशात तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर, नैनीताल आणि पिथौरागढमध्ये २३ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट आहे. जयपूर आणि धौलपूरमध्ये जोरदार पाऊस आहे तर महाराष्ट्रातील नांदेडमध्ये पुरामुळे परिस्थिती बिकट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here