नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यंमध्ये मान्सून पोहोचला असून आतापर्यंत ज्या राज्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, त्या सर्व राज्यांमध्ये आगामी काही दिवसातं पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करावी. वेळेवर शेत तयार केल्याने पावसात पाणी शेतात थांबून राहील आणि पेरणीयोग्य जमीन तयार राहील.
आगामी २४ तासात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि गोव्याच्या काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. तर अनेक भागात हा पाऊस अधिक होईल. त्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते.
याशिवाय केरळ, राजस्थान, बिहार, आसाम, त्रिपुरा या राज्यांत काही भागात आज चांगला पाऊस होऊ शकतो. यादरम्यान, आयएमडीने सांगितले की, राजधानी दिल्लीतील काही भागात गडगडाटासह पाऊस होईल. तर खासगी हवमान एजन्सी स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, मध्य पाकिस्तान आणि उत्तर पश्चिमी राजस्थानच्या परिसरात चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे. एक ट्रफ रेखा पश्चिम राजस्थानच्या चक्रीय वाऱ्यांपासून दक्षिण हरियाणा, दक्षिण पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालकडून उत्तर पूर्व बंगालच्या खाडीकडे जात आहे.
पुढीच २४ तासात बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम, उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या विविध भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. पूर्वोत्तर भारतामध्ये गुजरातचा काही भाग, कोकण आणि गोवा, कर्नाटकच्या किनारपट्टीवर मध्यम पाऊस पडेल. उत्तर प्रदेशचा मध्य भाग, उत्तराखंड, केरळ, उर्वरीत झारखंड आणि ओरिसाच्या काही भागात हलकी ते मध्यम पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग, दक्षिण-पूर्व राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा काही भाग, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, लक्षद्वीप, तेलंगणाच्या काही भागात तसेच आंध्र प्रदेशमध्ये हल्का पाऊस होऊ शकेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link