तामीळनाडूतील पलाकोडमध्ये पाण्याच्या कमतरतेचा ऊसाच्या शेतीवर परिणाम

धर्मपुरी : तामीळनाडूच्या पलाकोडमध्ये ऊसाची शेती करणारे शेतकरी यंदा पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. कारण, या भागातील भूजल पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कृषी विभाग आणि साखर कारखान्यांकडून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तसेच पलाकोड सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा आग्रह धरला आहे.

पाणी हीच धर्मपुरातील शेतकऱ्यांची मुख्य समस्या आहे. केसरगुली धरण, थोप्पैयार धरण आणि चिन्नार धरण पंचपल्लीसह बहुतांश धरणांमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा आहे. भूजल स्तर सातत्याने खालावत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पलाकोड सहकारी साखर कारखाना निष्क्रीय राहिल्याने शेतकऱ्यांची कारखान्यातील हिस्साही कमी झाला आहे. पुलिकराई येथील शेतकरी चिन्नासामी यांनी सांगितले की, गेल्या दशकापासून धर्मपुरी परिसर दुष्काळी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. तरीही येथील भूजल पातळी वाढविण्यासाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीत. अनेक शेतकरी गुंतवणूक करून बोअरवेल खोदतात. मात्र, त्या निकामी ठरत आहेत. वर्षभरात अनेक विहिरी आटतात. मग आम्ही शेती कशी करायची असा प्रश्न आहे. शेतातील गुंतवणूक वाढत असल्याचे चिन्नासामी यांनी सांगितले. ते म्हणाले, यापूर्वी आम्हाला कामगारंसाठी प्रती व्यक्ती ९०० रुपये द्यावे लागत होते. छोट्या शेतासाठीही पाच मजूर लागतात. ऊसाच्या दरात काहीच वाढ झाली नसल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here